loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी येथे रिक्षा व कारची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथील लक्ष्मी हॉटेल समोर रिक्षा व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय काशीराम पवार (वय २५, रा. रांगव चिखली सनगरवाडी, ता. संगमेश्वर) हे आपल्या रिक्षामधून जात असताना किया सेल्टोस कार चालकाने भरधाव वेगाने येत त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात धामणी येथील लक्ष्मी हॉटेल समोर मुंबई-गोवा महामार्गावर घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात अजय पवार किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी मोटार अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg