loader
Breaking News
Breaking News
Foto

देशव्यापी औषध विक्रेता बंदला सावंतवाडीत मोठा प्रतिसाद

सावंतवाडी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदला सावंतवाडी तालुक्यातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. गेले काही दिवस काळी फीत बांधून औषध विक्रेत्यांनी निषेध नोंदवला होता. काल मध्यरात्री १२ वा. पासून आज मध्यरात्री पर्यंत तालुक्यातील सुमारे १२५ हून अधिक औषध दुकाने कडेकोट बंद ठेवत सहभाग घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऑनलाईन औषधविक्री बंद करा, कोपॅर्पोरेटद्वारे अव्यवसायिक डिस्काउंट बंद करावी, २८.०८.२०१८, २६.०३.२०२० ची अधिसूचना मागे घ्यावा व बनावट औषधींपासून देश‌ वाचवावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. शहर व तालुक्यातील सर्व १२५ हून अधिक मेडिकल बंद राहणार आहेत. त्यामुळे औषध खरेदीसाठी येणाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाइकांना माघारी परतावे लागत आहे. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत औषध पुरवठा करण्यासाठी संघटनेकडून विशेष व्यवस्था देखील करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनान यासाठी सज्ज राहिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg