loader
Breaking News
Breaking News
Foto

झाडगाव एमआयडीसीतील अवैध बांधकामांना हटविले जाणार, नोटिस बजावणार्‍या अधिकार्‍यांशी लोकप्रतिनिधीची बाचाबाची

रत्नागिरी : रत्नागिरीतील झाडगाव एमआयडीसी परिसरातील सुमारे ५० बेकायदेशीर बांधकामधारकांना एमआयडीसी प्रशासनाने अखेरच्या नोटिसा बजावल्या. आगामी २८ मे ला ही सर्व अनधिकृत बांधकामे जेसीबी लावून जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. या कारवाईविरोधात कोणीही न्यायालयात जाऊन स्थगिती आणू नये, म्हणून एमआयडीसीने आधीच न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केले आहे. दरम्यान, या नोटिसांचे वाटप करत असताना एका स्वयंघोषित पुढाऱ्याने शासकीय कामात अडथळा आणत कर्मचाऱ्यांशी आरेरावी करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने त्याला भीक न घालता आपली कारवाई कायदेशीरपणे पुढे सुरू ठेवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

झाडगाव एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चिऱ्याचे बांधकाम, बेकायदेशीर वीज जोडण्या करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या संदर्भात एमआयडीसीने संबंधितांना दिलेली ही तिसरी आणि अंतिम नोटीस आहे. यापूर्वीच त्यांना अशा प्रकारची बेकायदेशीर बांधकामे न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. आज बजावण्यात आलेल्या अंतिम नोटिसीनंतर आता संबंधित अतिक्रमणधारकांना केवळ ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हा कालावधी संपताच २८ मे ला कडक पोलिस बंदोबस्तात ही सर्व बांधकामे पाडण्यात येणार असून, त्यासाठी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना आधीच संरक्षणाचे पत्र देण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

जेव्हा एमआयडीसीचे कर्मचारी या नोटिसांचे वाटप करण्यासाठी घटनास्थळी गेले, तेव्हा स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या एका स्वयंघोषित पुढाऱ्याने या शासकीय प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. "अधिकारी स्वतः नोटीस द्यायला का आले नाहीत?" असा उद्दट प्रश्न विचारत या पुढाऱ्याने कर्मचाऱ्यांशी आरेरावीची भाषा केली, ज्यामुळे काही काळ झाडगाव एमआयडीसी परिसरात वातावरण कमालीचे तापले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg