दापोली (प्रतिनिधी) : दापोली शहरातील रहिवाशांना दिवसेंदिवस तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील रहिवांशाना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचे लक्षात येताच भारतीय जनता पक्षाने दापोली शहरातील रहिवाशांना मोफत पाणी पुरवठा करत दिलासा देण्याचे मोठे काम सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील रहिवाशी भाजपाच्या या सामाजिक कामाचे समाधान व्यक्त करत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू करुन नागरिकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने करण्यात येत आहे. अशा या सामाजिक कामाचा शुभारंभ उत्तर रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपाचे आधारस्तंभ केदार साठे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी भाजपाचे संदीप केळकर, अतुल गोंदकर, श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, सचिन होडबे, प्रसाद मांडवकर, मयुरेश्वर वेल्हाळ त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नागरिकांना पाणी वाटप करताना सामाजिक बांधिलकी जपत सेवा हाच धर्म असल्याचा संदेश दिला. दापोली शहरात वाढत्या उष्णतेमुळे आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपच्यावतीने हा जनहिताचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळणार असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही रहिवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अशाच सामाजिक बांधिलकीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. राजकीय कार्यक्रमांपेक्षा समाजहिताच्या कामांना अधिक महत्त्व देत भाजपाने सुरू केलेल्या या सामाजिक कामाचे शहरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
























































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.