loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहर शिवसेनेच्या (उबाठा) निवेदनाला यश; मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर शहरातील मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था, खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आणि वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गुहागर शहरच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदन देण्यात आले होते. तसेच तातडीने काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनाची गंभीर दखल घेत अखेर गुहागर शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून उबाठा शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. वाहन चालक, पादचारी तसेच व्यापारी वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. “नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला होता. आंदोलनाचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ केला. काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास तसेच अपघातांना आळा बसण्यास या कामाचा मोठा फायदा होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg