loader
Breaking News
Breaking News
Foto

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम 18 मे 2026 रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 18 मे 2026 पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. सार्वजनिक व खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून मालमत्ता विरुपीत केल्यास अगर तशी तक्रार आल्यास मालमत्ता विरुपीकरण कायदा 1995 चे कलम 2 नुसार दंडनीय कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेशित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडणुकीसाठी सोमवार 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 1 जून 2026 असेल. मंगळवार 2 जून 2026 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून गुरुवार 4 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार 22 जून 2026 रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg