loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामस्थांची भेट घेऊन पाटपन्हाळेची ग्रामदेवता 21 मे रोजी जाणार मंदिरात

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावाच्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी आणि श्री मानाई या दोन्ही देवता पाटपन्हाळे ग्रामस्थांची भेट पूर्ण झाल्यावर गुरुवार दि.21 मे रोजी आपल्या देवळात प्रस्तान करणार आहेत. दोन्ही देवींची मंदिरे गावाच्या सीमेवरती आहेत. देवी महालक्ष्मीचे मंदिर वाकीच्या सीमेवरती आहे, तर देवी मानाईचे मंदिर मळण या गावाच्या सीमेजवळ आहे. पाटपन्हाळेची ग्रामदेवतेची पालखी शिमगोत्सव झाल्यानंतर गुढीपाडव्याला ग्रामस्थांच्या भेटीसाठी निघतात. संपूर्ण गावातून प्रत्येक वाडीमध्ये या पालख्या जातात. वाजत गाजत पालख्यांची मिरवणूक काढली जाते. गावातील प्रत्येक ग्रामस्थ आपल्या रक्षणकर्त्या ग्रामदेवतेची मनपूर्वक पूजा अर्चा करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता या दोन्ही पालख्या आपआपल्या देवळामध्ये विराजमान होणेसाठी जात आहेत. त्याआधी 20 मे ला विरबावा समजावणीचा कार्यक्रम झाले व त्यानंतरच या दोन ग्रामदेवता 21 मे ला आपापल्या देवळांमध्ये जातील. त्याआधी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी “आखाडा” या ठिकाणी दोन्ही बहिणींची महालक्ष्मी व मानाई देवीची भेट होते. या कार्यक्रमाला संपूर्ण गावातूनच नव्हेतर पंचक्रोशीतील भाविक उपस्थित असतात. याचबरोबर माहेरवाशीणी, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg