loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकल दिंडी

रत्नागिरी (जमीर खलफे) - पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे अध्यात्म मंदिर ते पावस येथील समाधी मंदिर अशी सायकल दिंडी उत्साहात काढली. यंदा या दिंडीचे पाचवे वर्ष होते. ओम राम कृष्ण हरी नामगजर करत सुमारे ४० किमीच्या या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरची आळी येथील स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिर येथून सायकल दिंडी सुरू झाली आणि भाट्ये, फणसोप, गोळपमार्गे पावसला समाधी मंदिरापर्यंत पोहोचली. या मार्गावर दरवर्षी जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस या पायी दिंडीतील वारकऱ्यांचीही भेट झाली. सायकल चालवूया, प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपूया, असा संदेश या दिंडीतून देण्यात आला. विशेष म्हणजे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या सदस्यांनीही रत्नागिरी ते पावस हे अंतर धावत पार केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाधी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी सर्व सायकलपट्टूंचे स्वागत करून अभिनंदन केले. त्यांनी क्लबला नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सेवा मंडळाने सायकलपटूंच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली. त्यानंतर सायकलपटू पुन्हा रत्नागिरीत परतले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg