loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहर आणि कोलगाव परिसरातून दोन मोटारसायकलची चोरी

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहर आणि लगतच्या कोलगाव परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोटारसायकल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान या चोऱ्या झाल्या असून, याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या गाड्यांचा तपशील जमाल खान (रा. जुना शिरोडा नाका, सावंतवाडी): यांची निळ्या-काळ्या रंगाची 'हिरो होंडा स्प्लेंडर प्रो' (क्रमांक MH 07 V 0235) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दयाल दाभोलकर (रा. धुरीटेम, कोलगाव): यांची काळ्या रंगाची 'हिरो शाईन' (क्रमांक MH 07 Z 1022) ही गाडी देखील चोरीला गेली आहे. ​या दोन्ही घटनांबाबत संबंधित मालकांनी तक्रार दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात आणि रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ​या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी आपली वाहने उभी करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg