loader
Breaking News
Breaking News
Foto

​अंध युवा मुलींसाठी सोलापूर येथे राज्यस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील अंध युवा मुलींच्या क्रिकेटमधील कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र'च्या वतीने ४ मे ते २४ मे या कालावधीत राज्यस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या शिबिरात नवीन आणि पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. ​या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी खेळाडूंसाठी निवास, भोजन आणि इतर सर्व व्यवस्था विनामूल्य असणार आहे. तसेच खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य, युनिफॉर्म, बूट आणि भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. या प्रशिक्षणातून भविष्यात महाराष्ट्र राज्यासाठी नवीन युवा महिला खेळाडूंचा शोध घेण्याचा संघटनेचा मानस आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी आपले नाव, जिल्हा, अंधत्वाचे प्रमाण, युनिफॉर्म आणि बूटची साईज या माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अंधत्वाचे प्रमाणपत्र किंवा युडीआयडी (UDID) कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. ​नाव नोंदणीसाठी ९८६९३२९१४१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा blindcabm@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठवावी. नाव नोंदणीची अंतिम मुदत २५ एप्रिलपर्यंत असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रने केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg