दिल्लीमधील कैलास हिल्स परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईलच्या चार्जरने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल मीना (२३ वय) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेच्या आधी याच आरोपीने आणखी एका दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, म्हणजे २४ तासांत २ बलात्कार आणि एक १ खून अशी धक्कादायक माहिती या आरोपीबाबत समोर आली आहे. दिली पोलीस आता सर्वबाजूने कसून चौकशी करत आहेत.
दिल्लीमधील कैलास हिल्स परिसरात राहणाऱ्या एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात हा आरोपी आधी काम करायचा. मात्र, काही कारणांवरून त्याला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा राग मनात धरून आरोपीने या अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेतील पीडित तरुणी ही आयआयटी पदवीधर असून ती यूपीएससीच्या परिक्षेची तयारी करत होती. वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी ८ वाजता या पीडित तरुणीचे आई-वडील जीमवरून परत घरी आले. मात्र, घरात येताच त्यांना त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतर या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांत दिल्ली पोलिसांनी बुधवारी २३ वर्षीय राहुल मीना याला अटक केली.
आरोपीने मुलीवर बलात्कार करून मोबाईल चार्जरने तिचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. मात्र, या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने दिल्लीतील गुन्हा करण्याच्या काही तास आधी राजस्थानमधील अलवरमध्ये आणखी दुसऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.












































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.