सावंतवाडी (प्रतिनिधी) - श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट, धाकोरे ता. सावंतवाडी या सेवाभावी संस्थेने दैवी उत्सवाचे औचित्य साधून ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर तसेच मातोश्री सेवाधाम ट्रस्ट, मुंबईच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबीर आयोजित केले होते. या दोन्ही शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे रक्तदान शिबीर हे धाकोरे गावच्या इतिहासातील आजवरचे पहिलेच रक्तदान शिबीर ठरले.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली तसेच रक्तदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून संस्थेचे नाव हे ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग म्हणून नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले तसेच जे रक्तदाते ऊन, वारा, पाऊस, वादळाची पर्वा न करता, दिवसरात्रही न पाहता अगदी रात्री दोन वाजता सुद्धा जाऊन रक्तदान करतात आणि एखाद्या पेशंटचा जीव वाचवतात अशा रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे संस्थेचे कर्तव्य आहे अशा भावनेतून संस्था कार्यरत आहे. त्याचप्रमाणे गावागावातील सेवाभावी संस्था किंवा मंडळे यांना रक्तदान शिबिरे घेण्यासाठी प्रवृत्त करून रक्तदानाची चळवळ गावागावात पोहोचविणे, हे सुद्धा आपले कर्तव्य समजून संस्था कार्यरत आहे. गावागावात रक्तदान शिबिरे घेतली की गावातील रक्तदात्यांचे रक्तगट गावाला समजतात आणि गावातीलच एखाद्या रुग्णाला गंभीर प्रसंगी रक्ताची गरज भासली असता तातडीने रक्तपुरवठा करून त्या गावातील रुग्णाचे प्राण वाचावेत, यासाठी सुद्धा संस्था प्रयत्न करते असे सांगून श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट, धाकोरे यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्थेसोबत रक्तदान शिबीर घेतले, त्याबद्दल आभार मानले. यावेळी एकूण अठ्ठावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर जवळपास शंभरहून अधिक लोकांनी नेत्रतपासणी करून घेतली.












































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.