loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

गुहागर - गुहागर तालुक्यातील आरे गावामध्ये ७ फेब्रु. रोजी रात्री १.०० ते १.३० वाजण्याच्या सुमारास क्रिकेटच्या सामन्यांवरून झालेल्या वादात गावातील जयेश खोत नामक इसमाला अविनाश शेटे, ओमकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर या तिघांनी लोखंडी फाईट, जांभा दगडाच्या साह्याने बेदम मारहाण करून त्यास गंभीररित्या जखमी केले होते. झालेल्या मारहाणीमुळे जयेश खोत हा सुमारे सहा दिवस सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचार घेत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फिर्यादी जयेश खोत याला झालेली मारहाण, घटनेचे गांभीर्य आणि पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली संशयित आरोपींची कस्टडी या बाबींचा विचार करून चिपळूण सत्र न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर संशयित आरोपींनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सर्व बाबींचा विचार करून माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर यांनी या घटनेतील प्रमुख सूत्रधार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला संशयित आरोपी अविनाश शेटे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मुख्य संशयित आरोपी अविनाश शेटे हा अद्यापही फरार असून त्याला अटक करण्याचे आव्हान आता गुहागर पोलिसांसमोर आहे. फिर्यादीतर्फे अ‍ॅड.संकेत साळवी यांनी काम पाहिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg