loader
Breaking News
Breaking News
Foto

गोरगरिबांच्या घरांना घरकुलाना लागणार्‍या वाळूसाठी मला दंड भरावा लागला तरी मी भरीन, हे पुण्य कर्म समजेन : आ.किरण सामंत

देवळे (प्रकाश चाळके) - वादळी वाऱ्यामुळे गोरगरीब लोकाची घरे पडली, आज पाऊस जवळ आला असुन गोरगरिबांची घरकुल वाळू न मिळाल्याने बांधण्याची राहिलीत. त्यासाठी लागणारी फाटी फाटी घमेली वाळू काढून ते नेत असतील आणि त्यासाठी प्रशासनाने दंड केला असेल तर तो मी भरायला तयार असून हे मी पुण्यकर्म समजतो, असे एका खाजगी वाहिनीच्या प्रश्नांना उत्तर देताना आ. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी म्हटले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका खाजगी वाहिनीने जैतापूर येथे होणाऱ्या वाळू उपशाबाबत तक्रारी वरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. भैय्या सामंत यांनी सामान्य जनतेची बाजू घेऊन हा वाळूचा उपसा ही आज सामान्य जनतेची गरज असून आपण सामान्य जनतेच्या बाजूने आहे. वेळप्रसंगी प्रशासनाने या सामान्य जनतेच्या गरजेला दंड बसवला तर तो मी स्वतः भरेन ते मी पुण्य कर्म समजेन. आपण सामान्य जनतेच्या पाठीशी ठाम आहोत असे रोखठोक उत्तरे दिले.

टाइम्स स्पेशल

आमदार भैय्या सावंत यांच्या उत्तराने राजापूर लांजा साखरपा संघातील जनतेने भैय्या सामंत यांच्या सारखे आमदार मिळणे हे या मतदार संघाचे भाग्यच असल्याचे म्हटले आहे. आ. भैय्या सामंत यांच्या रोख ठोक जबाबाचे राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील जनतेने स्वागतच केले असून " आमचा आमदार कामगिरी दमदार "अशी आणि "आपला हक्काचा माणूस " अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg