loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम; निराधारांना आधार

खेड (प्रतिनिधी )- सुसेरी गावातील स्वप्नील प्रदीप साळवी, वय ३६ यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात ३ लहान मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. त्या परिवारास लायन्स क्लबच्यावतीने प्रसाद उर्फ पप्पू शेठ यांच्याकडून जिन्नस भेट म्हणून देण्यात आले. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर पाठीमागे राहिलेल्या परिवाराची जबाबदारी म्हणून लायन्स अशा ठिकाणी जाऊन या वस्तू भेट स्वरूपात देत असते. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार ज्यांच्यावतीने वस्तू देण्यात आले असे लायन पप्पू शेठ आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg