loader
Breaking News
Breaking News
Foto

कास गावसह परिसरात पावसाळ्यापूर्वीच वीजेचा खेळखंडोबा ; पुरवठा सुरळीत करा, अन्यथा बल्ब आंदोलन छेडू - सरपंच प्रवीण पंडित

बांदा : प्रतिनिधी : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कास, मडुरा, पाडलोस, निगुडे, रोणापाल, शेर्ले, सातोसे परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दिवसातून किमान एकदा तरी तासन्तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाच दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कार्यालयावर आंदोलन छेडू असा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वीज खंडित झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून उलट उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोपही पंडित यांनी केला. भरमसाठ वीज बिले वसुलीसाठी वेळेवर येतात मग वीज पुरवठा खंडित का होतो? पावसाळ्यापूर्वीचे पाच सहा महिने अधिकाऱ्यांना दुरुस्तीची आठवण होत नाही आणि मे महिना सुरू झाला की देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तासन्तास वीज बंद ठेवली जाते. नागरिकांना याचा प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, असे पंडित यांनी सांगितले. ग्रामीण भागातील वीज प्रश्न तातडीने सोडवून अखंडित व सुरळीत वीज पुरवठा द्यावा, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभे राहील, असा इशारा सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

दर मंगळवारी देखभालीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जातो, मात्र प्रत्यक्षात कोणती देखभाल केली जाते, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सततच्या खंडित पुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य गरिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती असेल तर मुसळधार पावसात काय होणार, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg