संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रात भरतीच्या पाण्यात एक डंपर बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हर्णे जेट्टीच्या कामासाठी लागणाऱ्या डबरची वाहतूक करत असताना हा प्रकार घडला. सध्या हर्णे जेट्टी बांधण्याचे काम सुरू असून, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्याचे काम चालू आहे. आज दुपारी १२:३० च्या सुमारास समुद्रात भरतीला सुरुवात झाली होती. याच वेळी एक डंपर डबर टाकून परत येत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परतत असताना अचानक समुद्राच्या मोठ्या लाटा आल्या आणि हा डंपर वाळूमध्ये रुतून बसला.
वाळूत डंपर अडकल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यानंतर पाण्याची पातळी जसजशी वाढत गेली, तसतसा डंपर अधिकच खोल पाण्यात गेला आणि भरतीच्या पाण्यात बुडाला.भरतीच्या वेळेचा अंदाज न घेता डंपर समुद्रात नेल्याने चालकाचा निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. जेट्टीच्या कामादरम्यान अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे. याआधीही अशाच प्रकारे एक डंपर वाळूत रुतला होता व तो समुद्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता पुन्हा एक डंपर समुद्रात बुडाल्याने सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.