केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू आणि हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जात असल्याने फळप्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना गावातच रोजगार उपलब्ध झाल्यास मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर कमी होईल, असे मत प्रगतशील शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकर्यांच्या मते, काजू बोंडांना कचरा समजून फेकून दिले जाते. मात्र ब्राझीलसारख्या देशांनी याच बोंडांपासून कोट्यवधी रुपयांचा उद्योग उभा केला आहे. काजू बोंडापासून सरबत, जॅम, जेली, कँडी, लोणचे, चटणी, फेणी तसेच इथेनॉल आणि पशुखाद्य तयार केले जाते. काजूच्या कवचातील ‘उछडङ’ तेलाचा वापर औषधे, वंगण आणि व्हार्निश निर्मितीत होतो.
लांजा तालुक्यात सुमारे ७१० हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड असून १,५०० ते २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हापूस आंब्याची बागायती केली जाते. येथील लाल जांभी माती आणि हवामान आंबा उत्पादनासाठी पोषक मानले जाते. त्यामुळे या भागात फळप्रक्रिया उद्योग उभारून रोजगारनिर्मिती आणि शेतमालाला मूल्यवर्धन मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.