नवी मुंबई : प्रेम, धैर्य आणि समर्पणाची प्रचिती देणाऱ्या एका प्रकरणात 43 वर्षीय महिलेने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला. 48 वर्षीय पती दीर्घकाळापासून गंभीर यकृत विकाराशी झुंज देत होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय उरला होता. वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आलेल्या या अत्यंत गुंतागुंतीच्या ‘यकृत प्रत्यारोपण’ शस्त्रक्रियेला यश आले. जी.आय. (G.I.) सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीमाल आणि डॉ. रोहन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हिपॅटोलॉजी विभागातील डॉ. अमितकुमार मांडोत आणि डॉ. चेतन कलाल यांचा समावेश असलेल्या डॉक्टरांच्या टीमने, एका अत्यंत गुंतागुंतीच्या 'जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपणाची' शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
रुग्णाला डॉ. मनीष पेंडसे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अतिदक्षता विभागातील (ICU) अत्यंत महत्त्वाचे व्यवस्थापन डॉ. चंद्रशेखर तुळशीगेरी आणि डॉ. निशात तावडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले . डॉ. अदिती जैन आणि डॉ. विनोद यादव यांचा समावेश असलेल्या 'आयसीयु लिव्हर ट्रान्सप्लांट टीम'ने, शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णाच्या देखरेखीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ (Anaesthesiologists) डॉ. अनिल सिंग आणि डॉ. आदित्य प्रभुदेसाई, डॉ वैशाली शेंडे यांच्या सहकार्याने, या संपूर्ण टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सुरळीतपणे काम केले.या प्रत्यारोपणासाठी तब्बल 18 डॉक्टर आणि सर्जन्स तसेच सुमारे 20 परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम केले. नेरुळ येथील 48 वर्षीय मुकेश रामचंद्र तांडेल हे एक रिक्षाचालक असून गेल्या दोन वर्षांपासून गंभीर यकृताच्या आजाराने त्रस्त झाले होते. कालांतराने त्यांना ‘डीकंपेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज’ हा गंभीर आजार झाला. त्यामुळे त्यांना कावीळ, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे (अॅसाइटिस), मेंदूच्या कार्यावर परिणाम करणारी ‘हेपॅटिक एन्सेफालोपॅथी’, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी दुखापत आणि डाव्या पायाला सेल्युलायटिससारखे गंभीर संसर्ग झाला.
त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की चालणे, व्यवस्थित जेवणे किंवा अंथरुणावरुन उठणेही कठीण झाले होते. सततचा अशक्तपणा, पोटातील सूज आणि वाढत्या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत लिव्हर ट्रान्सप्लांट हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव मार्ग होता. यावेळी त्यांच्या पत्नी जनाबाई तांडेल यांनी कोणताही विचार न करता यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. स्वतः पूर्णपणे निरोगी असूनही मोठ्या शस्त्रक्रियेसाठी पुढे येणे हा अत्यंत धाडसी निर्णय होता.










































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.