पनवेल (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कामोठे शाखेत मंगळवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत संघटनाबांधणी, एकजूट आणि आगामी काळातील पक्षविस्तारावर भर देण्यात आला. नवनियुक्त जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसैनिकांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. कामोठे शाखेत पार पडलेल्या या बैठकीत विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामकाज, शाखांमधील समन्वय तसेच आगामी काळात पक्ष अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी संघटनेतील मतभेद आणि जुने वाद बाजूला ठेवून पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. “मागे काय झाले यापेक्षा पुढे काय करायचे यावर भर दिला पाहिजे. प्रत्येक शिवसैनिक हा पक्षाचा महत्त्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “सध्या कोणतीही निवडणूक नाही. मात्र संघटना मजबूत करण्यासाठी हाच सर्वात महत्त्वाचा काळ आहे. शाखा स्तरावर अधिक सक्रियपणे काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पनवेलमध्ये क्रमांक एकावर आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीत अनेक शिवसैनिकांनी स्थानिक प्रश्न, शाखास्तरावरील अडचणी आणि संघटनात्मक विषय मांडले. त्यावर सकारात्मक भूमिका घेत आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्याचे संकेत नेतृत्वाने दिले. या बैठकीस सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, गटनेत्या लीना गरड, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर गोवारी, शहर प्रमुख रामदास गोवारी, नगरसेविका रितिक्षा गोवारी, नगरसेवक नितीन गावंड, रायगड जिल्हा वक्त्या सुवर्णा वाळुंज, संगीता राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान युवक आणि महिला पदाधिकाऱ्यांना अधिक सक्रिय करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला. आगामी काळात शाखानिहाय कार्यक्रम, नागरिकांशी थेट संवाद आणि संघटनात्मक बैठका वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कामोठेतील या बैठकीतून संघटनेतील एकजूट, नव्या नेतृत्वावरील विश्वास आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी सज्ज होण्याचा संदेश देण्यात आला. पनवेल परिसरात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.











































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.