loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरणाच्या निर्णयास विरोध, खेड काँग्रेस चे निवेदन

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 40 कलम 51 आणि कलम 64 मधील अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 मधील नियम 43. 43 अ व 52 मधील तरतूदीनुसार विशिष्ट अटीच्या अधिन राहून अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील ग्रामीण व नागरी भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणेसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. गायरान वगळून अन्य शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने १ जानेवारी २०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमणे ठरावीक अटीवर नियमित केली जाणार असल्याचे समजते. सविनय निवेदन असे की, राज्य शासनाने शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे पालन करणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणारा आहे. ज्या नागरिकांनी प्रामाणिकपणे सर्व शासकीय नियम, कर व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन स्वतःचे घर उभारले आहे. त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होत आहे. दुसरीकडे ज्या व्यक्तीनी नियम व कायदे धाब्यावर बसवून शासकीय जमिनीवर बेकादेशीर अतिक्रमण केले आहे, त्यांना संरक्षण व नियमितीकरण देणे हे कायद्याच्या तत्त्वाना धरुन नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात आमचे खालील आक्षेप व मागण्या नमूद करीत आहोतः १) कायद्याचे उल्लंघन प्रोत्साहीत होण्याची शक्यता : अशा निर्णयामुळे भविष्यात अधिक अतिक्रमणे करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. कायदेशीर मार्गाने घर घेणाऱ्या नागरिकांवर हा निर्णय अन्यायकारक आहे. सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी खाजगीकरणाकडे वळण्याचा धोका आहे. पात्रता निकष व अंमलबजावणी प्रक्रीयेस गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागण्याः १) सदर अतिक्रमण नियमितीकरणाचा निर्णय तात्काळ स्थगित करावा. २) या निर्णयाचा पुनर्विचार करुन कठोर व न्याय्य धोरण तयार करावे. ३) जाणीपूर्वक अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी. ४) प्रामाणिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे. ५) भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.

टाईम्स स्पेशल

आपण या निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा. ही नम्र विनंती. अन्यथा या प्रकरणी लोकशाही मार्गाने खेडमधील नागरी व तालुका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी. सदरचे निवेदन मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद, खेड तहसिलदार, खेड उपविभागीय अधिकारी, खेड यांच्यासह मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अझीम सुर्वे, अध्यक्ष, खेड काँग्रेस, फैसल देसाई, कार्याध्यक्ष, खेड काँग्रेस, सीमा शिंदे (जाधव), नाझिमा तांबे, प्रफुल्ल शेवरकर, जनरल सेक्रेटरी, काँग्रेस आदी उपस्तित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg