सावंतवाडी (प्रतिनिधी) - भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून देशहित, विकास आणि जनसेवा हीच आमची प्रमुख भूमिका आहे, असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी भारतमाता, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, "भाजप ही विचारांची आणि त्यागाची चळवळ आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टावर हा पक्ष उभा राहिला असून आज देशाच्या विकासाचा आधारस्तंभ बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी उंची गाठली असून ही विचारधारा गावागावात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे." या सोहळ्याला जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, उपसभापती गौरव मुळीक, माजी नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर, साईनाथ जामदार, सुमित वाडकर, संतोष गावस, समीर कुडाळकर, विजय रेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.