पनवेल :- नवी मुंबई काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामचंद्र दळवी (आबा) यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शन अंतर्गत नवी मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या रेशनच्या समस्या आणि गॅस सिलिंडरचा वाढता तुटवडा या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई काँग्रेसच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने नुकतीच शिधावाटप अधिकारी श्रीमती छाया पालवे यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील नागरिकांना रेशनिंग कार्यालयात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात शिधा (रेशन) मिळावा, तसेच रेशन कार्डशी संबंधित प्रलंबित कामे विनाअडथळा मार्गी लागावीत, यासाठी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. यासोबतच, शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्याच्या समस्येवरही विशेष लक्ष वेधण्यात आले. गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करून सर्वसामान्यांची होणारी गैरसोय टाळावी, तसेच शिधा कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या शिधा आणि कार्यालयीन वेळेचे नाम फलक लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या संयुक्त शिष्टमंडळात इंटक जिल्हाध्यक्ष महेश भणगे, नवी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष सुतार, तुकाराम कदम, अन्वर हवालदार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. तसेच, "भविष्यातही जनतेला भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रस्थानी असेल. जनतेच्या हक्कांसाठी व त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देण्यास काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध राहील," असे प्रतिपादन यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आले.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.