loader
Breaking News
Breaking News
Foto

दारूच्या वादातून मित्राचा मृत्यू; देवरूख पोलिसांकडून संशयित अटकेत

देवरुख (सुरेश सप्रे) - दोन मित्रांमधे दारू पिण्यावरून वादावादी झालेवर जखमी झालेल्या मित्राच्या मरणास कारणीभुत ठरलेवरून देवरूख पोलिसांनी जलदगतीने तपास करत छडा लावत एका संशयीतास अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत वृत असे की संशयित आरोपी आशिष शांताराम भावके वय २७ रा. घोगाव ता. कराड जि.सातारा व गुन्ह्यातील मयत व सुधीर अर्जुन यादव वय - ३० वर्ष रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा हेएकमेकांचे चांगले मित्र व नातेवाईक असल्याने ते रत्नागिरी येथे आरोपी याचे इंर्टिका गाडी नंबर एम. एच. ५० / एन / ४६४२ ने निघाले व रत्नागिरी येथे आरेवारे येथे जाऊन त्यांना दारु पिण्याचे सवय असल्याने त्यांनी दारु पिवुन जेवण करुन परत घरी जाणे करीता दि ३१/०३/२०२६ रोजी २३.३० वाजता आले वेळी मयत याने आरोपी याचे कडे मला आताचे आता दारु पिण्यास पाहीजे असे सांगितले. त्यावेळी आरोपी याने दारु येथे भेटणार नाही असे म्हणाला. त्यावरुन त्या दोघामध्ये वादविवाद होऊन मयत याने आरोपी याचे ईर्टिका गाडीवर चढुन बसुन पुढील बॉनेट चेपुन व पुढील काच फोडुन गाडीचे नुकसान केले. याचा राग संशयित आरोपीयास येऊन त्याने जखमी मयत हा गाडीचे बोनेटवर चढला असता तो गाडी चालु केल्यामुळे तो खाली पडुन त्यास दुखापती होऊन मयत होऊ शकतो असे माहिती असताना देखील आरोपी याने गाडी चालु केली असता जखमी मयत हा गाडीचे बोनेट वरुन खाली पडुन त्याचे पायास व डावे बाजुस बरगडी, खुबा, पोट याठिकाणी खरचटुन व डावा पाय घोटयात मोडुन लहान मोठया दुखापती झालेल्या असताना देखील आरोपी याने त्यास त्याच ठिकाणी सोडुन निघुन गेला. त्यानंतर दुस-या दिवशी जखमी मयत यास उपचारा करीता प्रा. आ. केंद्र साखरपा येथे दाखल केले असता त्याठिकाणी उपचार चालु असताना तो मयत झालेला आहे म्हणुन देवरुख पोलीस ठाणे अ.मृ.रजि.नं. १२/२०२६ बी.एन.एस.१९४ प्रमाणे दाखल प्रकरणातील आजवर झाले चौकशी अंती आरोपी याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टाइम्स स्पेशल

गु. रजि. नं.देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ४५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी प्रमोद अनंत वाघाटे, वय ५७ वर्ष यांनी संशयित आरोपी आशिष शांताराम भावके, वय २७ रा. घोगाव ता.कराड जि.सातारा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. देवरुख पोलीस ठाणे अ.मृ. रजि.नं. १२/२०२६ बी. एन. एस. १९४ प्रमाणे दाखल प्रकरणातील आजवर झाले चौकशी अंती संशयित आरोपी याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उप विभागीय अधिकारी सुरेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली पीआय उदय झावरे व सहकारी करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg