loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती खेड आयोजित स्नेहबंध 2026 अंतर्गत कॅरम स्पर्धेमध्ये राजाराम दरेकर यांना विजेतेपद

खेड - खेड तालुका पंचायत समिती योजना 2026 अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कॅरम स्पर्धेमध्ये कळमणी खुर्द शाळेचे मुख्याध्यापक राजाराम दरेकर यांनी अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद खेचून आणले. बक्षीस वितरण कार्यक्रम खेड तालुक्याच्या सभापती आफिया परकार, उपसभापती सुनील मोरे, खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजाराम दरेकर हे उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून खेड तालुक्यात ओळखले जातात. त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट क्रिकेटर अशी देखील त्यांची ओळख आहे. राजाराम दरेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल खेड तालुक्यातील शिक्षक वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg