मुंबई: उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर १० टक्के हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे दोन रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी भाडेवाढ केवळ साध्या गाड्यांना असून स्वच्छता अधिभार सरसकट एसटी गाड्यांना लागू राहणार आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासात साध्या एसटीसाठी २८१ रुपये मोजावे लागत आहेत. १५ एप्रिलला हंगामी भाडेवाढीनुसार ३१२ आणि दोन रुपये अधिभार असे एकूण ३१४ रुपये मोजावे लागणार आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) एसटी महामंडळाला यात्रा, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसांत ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सन २०२६च्या उन्हाळी हंगामासाठी १० टक्के प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाडेवाढ १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. उन्हाळी भाडेवाढ ही केवळ दोन महिन्यांसाठी असून स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे. एसटी महामंडळाकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे एसटी गाड्यांसह, स्थानके आणि आगार स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवासी स्वच्छतेसाठी असलेल्या उपक्रमासाठी प्रति तिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अधिभार आकारण्यात येणार आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असणार नाही. आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा प्रवाशांसाठी पाच रुपये अधिभार असणार आहे. पास देताना प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार असणार नाही. एसटीच्या बसगाड्या भाडेतत्त्वाने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये इतका अधिभार द्यावा लागणार आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे. भाडेवाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असेल. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई-बस गाड्यांना वगळण्यात आले आहे. उन्हाळी हंगामासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून फरकाची रक्कम प्रवासादरम्यान वसूल करण्याच्या सूचना महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.