loader
Breaking News
Breaking News
Foto

स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा, दाम्पत्याला अटक : पीडित महिलेची सुटका

पनवेल : बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या कळंबोलीतील एका स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून पती-पत्नीला अटक केली आहे. तसेच एका पीडित महिलेची येथून सुटका केली आहे. कळंबोली, सेक्टर-१६ मधील निलकंठ धाम इमारतीतील गोल्डन किंग सलून आणि स्पा येथे मसाज पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे व.पो.नि. पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन किंग सलून आणि स्पामध्ये ३ एप्रिल रोजी दुपारी बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. या कारवाई पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून स्वीकारलेल्या ५०० रुपयांच्या नोटा, तीन महागडे मोबाईल जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित समीर ऊर्फ अलीगोर अब्दुलहफिज अन्सारी (३३) व त्याची पत्नी परी ऊर्फ सलमा अलीगोर अन्सारी (वय २६) हे पती-पत्नी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने समीर परी या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg