loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; आठवडाभरात घटना वाढल्या, शहरात चिंतेचे वातावरण

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहर आणि परिसरात अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून, आज एका १७ वर्षीय मुलीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या अवघ्या आठवडाभरात तालुक्यातील ही पाचवी घटना असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीने मळगाव येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे धागेदोरे अद्याप हाती लागू शकलेले नाहीत. सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार, यातील बहुतांश घटना किरकोळ कारणांतून किंवा रागाच्या भरात घडल्याचे समोर येत आहे. वाढत्या शैक्षणिक दबावामुळे, कौटुंबिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून ही पावले उचलली जात आहेत, याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg