रत्नागिरी - अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाची करडी नजर असून अवैध मद्याची निर्मिती, वाहतुक तसेच विक्री विरुध्द या विभागाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. हातभट्टी दारु निर्मिती व विक्री होणा-या ठिकाणांचा शोध घेवून कारवाई करणे, परराज्यातील बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करणे, मद्याची अवैधपणे विक्री करणारे चायनिज सेंटर, हॉटेल्स, ढाबे यांचा शोध घेणे तसेच अवैध दारु धंदयाना प्रतिबंध करण्याच्या सुचना सर्व कार्यकारी व भरारी पथकाच्या युनिटना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने अवैध मद्याविरुध्द कारवाई करुन १०६६ वारस व १४४ बेवारस असे एकूण १२१० गुन्हे नोंद केले असून १०८१ आरोपीत इसमांना अटक केली आहे.
सदर दाखल गुन्ह्यात हातभट्टीची दारु ३३,४०३ लिटर, देशी मद्य ८२१.८९ बल्क लिटर, विदेशी मद्य ३३५.६८ बल्क लिटर, बियर १८३.६४ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले विदेशी मद्य २४,८६२.८४ बल्क लिटर, रसायन २,२८,४२५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या १६ वाहनांसह एकूण रुपये ४,५८,३०,४०१/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी, गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या अवैध विदेशी मद्याविरुध्द कारवाई करुन १६४ गुन्हे नोंद करण्यात आले असून गोवा राज्यात निर्मित मद्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ०७वाहनांसह एकूण रुपये २,९२,११,२८०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सन २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ९३ नुसार एकूण १२८ प्रस्ताव जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी २९ प्रकरणात रुपये १२,२५,०००/- एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारुधंदयात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत. मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गावरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे.
तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतुक होऊ नये, याकरीता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलीसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हातभट्टी दारुचो निर्मिती होणाऱ्या हॉटस्पॉटवर विशेष मोहिमा राबवून कारवाई करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मित्ती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॅप क्रमांक-८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/खबर देणाऱ्या व्यक्तिचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.