loader
Breaking News
Breaking News
Foto

अचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबार; एक ठार, एक जखमी; तालुक्यात खळबळ

वैभववाडी (संजय शेळके) - तालुक्यातील अचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक ठार झाला असून दुसर्‍याच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला. सदरची घटना मध्यरात्री जंगल भागात घडली. या घटनेने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार वैभववाडी फोंडा महामार्गाला लागून असलेल्या आचिर्णे गावाच्या परिसरात काहीजण मध्यरात्री शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याच्या खांद्याला गोळी लागून जखमी झाला. जखमीला तातडीने कणकवली येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सागर सुरेश पोटळे, वय वर्ष २६, राहणार घाणेकरवाडी आचिर्णे असे मृताचे नाव असून कृष्णा सुरेश कातकर, वय वर्ष २५, राहणारआचिर्णे घाणेकरवाडी हा जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg