मालवण (प्रतिनिधी) - दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) मालवण तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सायं. ४ वा. पंचशील धम्म ध्वजारोहण व धम्म वंदना, सायं. ४:३० वा. भीम गीत गायन, सायं. ६ वा. जाहीर सभा, रात्री ८ ते १० वा. गाव शाखा सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष रविकांत कदम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कणकवली येथील कवी व स्तंभलेखक अजय कांडर, प्रमुख अतिथी म्हणून बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे विश्वस्त दिपक भोगटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.