रत्नागिरी - तालुक्यातील जयगड येथील खंडाळा येथे प्रथमच खंडाळा महोत्सव आणि भगवा चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 13 ते 19 एप्रिल या कालावधीत खंडाळा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. तर 17 ते 21 एप्रिल या कालावधीत भगवा चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांना प्रथमच दुहेरी पर्वणी या माध्यमातून मिळणार आहे. 13 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत प्रथमच खंडाळा बाजारपेठ येथील प्रसाद उर्फ बाबू पाटील यांच्या कार्यालयाशेजारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबू पाटील मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने तसेच संकेत नवले व विजय शिर्के यांच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खंडाळा महोत्सव लावणी महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. या महोत्सवात दररोज विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर होणार आहेत. याशिवाय होम मिनिस्टर, डान्स स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, नमन, जाखडी व इतर लोककला यांचे देखील सादरीकरण होणार आहे. 13 ते 19 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत या महोत्सवाचे सादरीकरण होणार आहे. खंडाळा महोत्सवाशिवाय सलग तिसऱ्यांचा भगवा चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री चंडिकादेवी नांदीवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित आणि बाबू पाटील मित्रमंडळ पुरस्कृत जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला पंचक्रोशी मर्यादित कबड्डी स्पर्धेचा थरार 17 ते 21 एप्रिल दरम्यान रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. यामध्ये पंचक्रोशी मर्यादित प्रथम पारितोषिक 10 भात आहे. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाठी विजेत्या संघासाठी 33 हजार 333 व आकर्षक चषक तसेच जिल्हास्तरीय महिला प्रथम क्रमांकासाठी 10 हजार आणि रोख देण्यात येण्यात येणार आहे. प्रत्येक गटात गटात पाच विजेत्यांना अशी अनेक बक्षिसे वाटली जाणार आवाज आहेत. भगवा चषक कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दीपक भुवड 7798183349, सुजित भुवड 90 49964324, राहुल भुवड 9764522402 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.