loader
Breaking News
Breaking News
Foto

मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवून शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांनी साजरा केला जागतिक जल दिवस

करंजाडे - शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबविण्यात आली. ज्या प्रमाणे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या ३ गरजा आहेत. त्याचप्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या देखील तश्याच प्रकारे गरजा आहेत. सध्या उन्ह्याचे दिवस आहेत, पक्षांना व मुक्या प्राण्यांना सध्या पाणी व खाऊची गरज आहे. याचेच भान ठेऊन शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना करंजाडे मध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ह्या कार्यक्रमाला शिव प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. ह्यावेळी शिव प्रतिष्ठानच्या वतीने निसर्ग व पर्यावरणचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पक्षांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी अश्या संकल्पना राबविल्या पाहिजेत. असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. निसर्ग व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेत असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सदर संस्थेने सर्वांना दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg