loader
Breaking News
Breaking News
Foto

डोबाचीशेळवाडीत विद्यार्थ्यांसाठी रंगभरणे व चित्रकला स्पर्धा

बांदा (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने डोबाचीशेळवाडी येथे रंगभरणे व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ (इन्सुली) यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं. ६ (डोबाची शेळ) येथे होणार असून परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे विविध गट करण्यात आले आहेत. अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर इयत्ता ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार असून “माझी शाळा माझा अभिमान” आणि “झेंडावंदन” हे विषय देण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

डोबाचीशेळवाडी परिसरातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे निवासी विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी व हितचिंतक कमिटी, शाळा नं. ६ यांच्या वतीने करण्यात आले असून शैलेश पालव (शाळा व्यवस्थापक अध्यक्ष), प्रदीप मं. पेडणेकर (माजी विद्यार्थी कमिटी अध्यक्ष), चंद्रशेखर मुंडलिक (माजी विद्यार्थी कमिटी सचिव) व श्रावणी सावंत (मुख्याध्यापिका) हे आयोजनाची धुरा सांभाळत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg