loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी फिश मार्केटमधील उघड्या गटारामुळे नागरिक जखमी; तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषद फिश मार्केटमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील उघड्या गटारामुळे आज अपघात होऊन एक तरुण आणि एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, फिश मार्केटच्या परिसरातून जात असताना येथील गटाराचा अंदाज न आल्याने या दोन्ही व्यक्तींचा पाय गटारात अडकला आणि त्यांना दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली असून, या ठिकाणी गटारांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे समोर आले आहे. ​या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले आणि उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. मार्केटमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे भविष्यातील मोठे अपघात टाळण्यासाठी पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg