खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन क्षेत्र किल्ले रसाळगडकडे जाणा-या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावर प्रवासी वाहतूक ठप्प होण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक प्रेमी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड हे सर्व पर्यटक प्रेमी नागरिकांचे आकर्षण आहे. येथे प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. परंतू खराब रस्त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरीकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड ला जोडणारा इजिमा 37 या मार्गाचा टप्पा आवळीचा पेडा ते रसाळगड किल्ला बस स्टॉप हा मार्ग पुर्णपणे उखडला गेला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहानांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या मार्गावर काही ठिकाणी संरक्षण भिंतींची आवश्यकता असतानाही प्रशासनाचा जिल्हा नियोजन व सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही. मागील पाच वर्षांपासून शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक प्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी प्रकट होत आहे. पर्यटन क्षेत्र किल्ले रसाळगड रस्त्याची शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याने शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १ मे २०२६ रोजी खेड तहसिलदार कार्यालय समोर, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेच्या बॅनरखाली आमरण उपोषण आंदोलन करण्याचे इशारा पत्र प्रशासनाच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आले आहे.
दिनांक १ मे रोजी तहसिलदार कार्यालय खेड समोर होणा-या उपोषण आंदोलनात घेरारसाळगड गावातील सर्व ग्रामस्थ व खेड तालुक्यातील सर्व पर्यटक प्रेमी नागरिक व संघटना यांनी सहभागी होऊन सदर उपोषण आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे जाहीर आवाहन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.