loader
Breaking News
Breaking News
Foto

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये अद्यापही नोंदणी न झाल्यामुळे कामगार विविध योजनांपासून वंचित; मनसेकडून गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

वरवेली (वार्ताहर) - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रातील स्त्री-पुरुष कामगारांची अद्यापही नोंदणी न झाल्यामुळे विविध योजनांपासून कामगारांना वंचित रहावे लागत असून कामगार नोंदणीसाठी सुद्धा आपल्या स्तरावरून ग्रामपंचायत कार्यालय येथे कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर व कामगार व्यवस्थापक, तालुका बांधकाम कामगार कार्यालय, गुहागर यांना केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या स्त्री-पुरुष कामगारांची अद्यापही नोंदणी न झाल्यामुळें तसेच ते कामगार नोंदणीकृत नसल्यामुळे कामगारांना आर्थिक मदत, आरोग्य, आणि शैक्षणिक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम कामगारांना मिळणारे फायदे व सुविधा याची माहिती अद्यापही जेवढी पाहिजे तेवढी ग्रामीण भागामध्ये पोहोचली नाही. ग्रामीण भागात घर इमारत बांधण्या संदर्भात अनेक कामे हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील पुरुष व महिला कामगार करत असतात परंतु सदरचे काम मर्यादित दिवसापुरते सुरू असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या घराच्या बांधकाम करण्यासाठी कामगार जात असतात. अनेक कामगार नोंदणीकृत असलेल्या ठेकेदाकडे काम करत नाहीत. ग्रामीण व शहर भागामध्ये बांधकामामध्ये रोजंदारीवर काम करतात, बहुतांश कामगार वेगवेगळ्या घर मालकांकडे रोजंदारी करत असतात, परंतु त्यांना बांधकाम कामगार असूनही ९० दिवस काम केल्याचा दाखला मिळत नाही. अनेक कामगार एका मालकाकडे साधारणपणे १५ ते २० दिवस काम करतात, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मालकाकडे काम करतात, हे सत्र वर्षभर सुरू असते. कामगारांनी ज्या घर मालकांकडे रोजंदारी केली याचा दाखला घरमालक यांच्याकडून लिहून देऊन सुद्धा ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत अधिकारी त्यांना मागील वर्षात ९० दिवसांपेक्षा जास्त काम केल्यास दाखला देत नाहीत. अनेक वेळा या संदर्भात ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याजवळ संपर्क साधून सुद्धा कोणीही कामगाराला न्याय देत नाहीत.

टाईम्स स्पेशल

संबंधित कामगार मोठ्या ठेकेदाराकडे काम करत नसल्यामुळे त्यांना रजिस्टर असलेल्या ठेकेदाराकडून मागील वर्षी ९० दिवस काम करत असल्याचा दाखला उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामगार असूनही विविध शासनाकडून मिळत असलेल्या कामगारांच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या संदर्भात ग्रामीण भागामध्ये कामगारांना विविध योजनांची माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे कामगार कार्यालयाकडून सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत जेणेकरून बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा होईल. तसेच कामगार नोंदणीसाठी सुद्धा आपल्या स्तरावरून ग्रामपंचायत कार्यालय येथे कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आम्ही करत आहोत. सदर दिलेल्या निवेदनावर त्वरित कार्यवाही आपल्या विभागामार्फत होईल, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg