खेड - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या सीबीएसई अकरावी विज्ञान शाखेची सुरूवात विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांचा वर्षाव करून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, विषयशिक्षक डॉ. प्राची जोशी, प्रा. विशाल सिंग यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून रोटरी स्कूलमधील अद्ययावत शिक्षणप्रणालीचा लाभ घेवून आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे सांगितले. अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यामागचा हेतू आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे ’रोटरी स्कूल हे आमचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे विश्वासाचे ज्ञानमंदिर आहे’ तसेच रोटरी स्कूलमधील सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्य संपादन करून शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपत आहे.
तसेच सन 2013-2014 वर्षापासून विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची सी. बी. एस. ई. बोर्डाची मान्यता मिळवून प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट निकालासह यशस्वितेकडे वाटचाल केली. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत सहशालेय उपक्रमांची जोड देवून प्रत्येक क्षेत्रात आपली उल्लेखनिय कामगिरी पार पाडत आहे असे सांगितले. त्यानंतर प्रा. बाळासाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे नियम व नियमावली समजावून सांगितली. तद्नंतर मार्गदर्शक शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते कृणाल मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र दिले. १० वी आणि ११ वी च्या अभ्यासातील तफावत ओळखून विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वेळेचे नियोजन, कॉलेज, प्रॅक्टिकल्स आणि स्वतःचा अभ्यास यांचा अचूक समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक शिस्तबद्ध वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच समुपदेशक प्रा. भक्ती करंबेळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीतून अकरावीमध्ये आल्यावर वेळेचे व अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे सांगितले.
सदर कार्यक्रमानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष म्युझिक थेरपी (संगीत उपचार) सत्र घेतले. संगीताच्या सुरावलींनी सुरू झालेला हा स्वागताचा सोहळा विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील अशा स्वरूपाचा ठरला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी विविध फनी गेम्सचा मनमुराद आनंद लुटला. या मजेशीर खेळांमुळे विद्यार्थ्यांमधील संकोच दूर होऊन मैत्रीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेची आत्तापर्यंतची प्रगती व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती करंबेळकर, प्रा. सरीता भारती व प्रा. धनुजा धुत यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.