loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांचा २ लाखाचा विमा

मालवण (प्रतिनिधी) - माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा उतरण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी विमाधारक ६० वर्षांच्या आतील असणे आवश्यक आहे. यात विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची १००% रक्कम, अपघातामध्ये कायमस्वरुपी १००% अपंगत्व आल्यास विम्याची १००% रक्कम, अपघातामध्ये कोणत्याही २ अवयवांचे कायम अपंगत्व (हात, पाय, डोळे) विम्याची १००% रक्कम, अपघातामध्ये कोणत्याही १ अवयवाचे कायम अपंगत्व (हात, पाय, डोळे) विम्याची ५०% रक्कम मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी मोबाईल नंबर, आधारकार्ड झेरॉक्स, वारस आधारकार्ड झेरॉक्स आदी कागदपत्रे आवश्यक असून नाव नोंदणीसाठी निलेश लुडबे ९४०४७३७७०८, संकेत राऊळ - ७४९९६९७६९८, राजा मांजरेकर -८४२१६७९२१८, विठू वराडकर ७२१९८३८८४४ यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुकांनी ९ एप्रिल पर्यंत शिवसेना मालवण शाखा, मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण येथे नाव नोंदणी करावी. या विम्याचे वितरण १० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. शिवसेना मालवण शाखा येथे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख मंदार लुडबे व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg