loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाच्या वाडी-वस्ती संपर्क अभियानाचा पहिला दिवस उत्साहात

रत्नागिरी - भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरात शहर मंडळ आयोजित वाडी-वस्ती संपर्क अभियानाचा पहिला दिवस प्रभाग क्रमांक ७ मधून उत्साहात सुरुवात करण्यात आली. दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५:०० वाजता सहकार नगर, नाचणे नवलाई मंदिरातून वाडी वस्ती संपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात जिल्हा पदाधिकारी शहर पदाधिकारी बूथ प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांशी गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच एस.आय.आर. (मतदार यादी संदर्भातील प्रक्रिया) विषयी माहिती देत येणाऱ्या मतदार यादीबाबत जनजागृती करण्यात आली. या संवादामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशाच प्रकारे आमच्याकडे येत राहा अशी अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभियानाचा समारोप चहापानाने करण्यात आला. यावेळी उपस्थित राजन पटवर्धन, शेखर लेले, मोहन पटवर्धन, अशोक वाडेकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, निलेश आखाडे, बाबू सुर्वे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, प्रज्ञा टाकळे, प्रीती शिंदे, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, नंदू चव्हाण, संतोष सावंत, प्रसाद बाष्ट्ये, सोनाली केसरकर, तुषार देसाई, मंदार भोळे, संजु बने, नरेंद्र कदम आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg