लांजा (संजय साळवी) - गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, परिणामी जंगली प्राण्यांचा नष्ट होत चाललेला अधिवास यामुळे बिबट्या तसेच गवे सारखे जंगली प्राणी भक्ष्याच्या तसेच पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. हे जंगली प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर ते रस्त्यावर फिरताना त्यांची वाहनांना धडक बसते आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. शनिवारी ४ एप्रिल रोजी लांजा शहरातील कुक्कुटपालन येथे घडलेल्या मृत बिबट्याच्या घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
झाडे आणि जंगले हा पर्यावरण संतुलनाचे एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड त्यातून उध्वस्त झालेली वने, जंगले यामुळे बिबट्या आणि गवे सारख्या संरक्षित प्राण्याचा अधिवासच नष्ट होत चालला आहे. त्यामुळे ते मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बिबट्या, गवे यांच्याबरोबरच डुकरे, कोल्हे माकडे यासारखे जंगली प्राणी हे आता मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलांमुळे व अन्नसाखळीमुळे हे प्राणी कधीही मानवी भागाकडे वळत नव्हते. मात्र काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने या प्राण्यांचे वस्तीस्थाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे भूक आणि तहानेने व्याकुळ झालेले हे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. भक्षाच्या शोधात आलेल्या बिबटे हे कधी विहिरीत पडून तर कधी वाहनांची धडक बसून रस्त्यावर मृत्युमुखी पडत आहेत. लांजा व राजापूर या दोन तालुक्यांत अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे जंगलतोडीवर आळा घालणे काळाची गरज बनली आहे. मात्र हे नेमके कोणी करायचे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड, वृक्षतोड होत असताना नवीन झाडे लावण्याबाबत लोकांमध्ये उदासीनता आहे. कायद्याचे उल्लंघन करून आणि नियम धाब्यावर बसवून वक्षतोड केली जात असल्याने जंगले उद्वस्त होत आहेत. मात्र याचा फटका हा वन्य प्राण्यांना बसत असून भक्षच मिळेनाशे झाल्याने हे प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. मात्र, शनिवारी ४ एप्रिल रोजी लांजा शहरातील कुक्कुटपालन या संस्थेच्या आंबा आणि काजूच्या बागेत सहा महिन्यांच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वृक्षतोडीला आळा घालणे ही बाब गरजेची बनली आहे.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.