loader
Breaking News
Breaking News
Foto

काही भागात उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

पुणे - राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. काही भागात उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

10 एप्रिल रोजी ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे उकाडा अधिक तीव्र जाणवणार आहे. मुंबईत कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्णतेसोबतच अचानक बदलणाऱ्या हवामानाचा फटका नागरिकांना बसू शकतो.

टाइम्स स्पेशल

हवामान खात्याने नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि गरज नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा दिल्यामुळे हवामान ‘विचित्र’ स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg