loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची तायक्वांदो रोलिंग मॅट

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आमदार किरण सामंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ लांजा तालुक्यात उपलब्ध झाली आहेत. या मॅटचे उद्घाटन शासकीय विश्रामगृह लांजा येथे नुकतेच पार पडले. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असूनही त्यांना योग्य सुविधा व क्रीडा साहित्य मिळत नाही, ही उणीव ओळखून आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच हा सकारात्मक परिणाम असून, अशा प्रकारची अत्याधुनिक मॅट देशात प्रथमच लांज्यात उपलब्ध झाली आहे.या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे.या ‘लेव्हल-३’ मॅटमुळे आता लांजातील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मॅटचे उद्घाटन शासकीय विश्रामगृह, लांजा येथे आमदार किरण सामंत जिल्हा क्रीडा अधिकारी . विजय शिंदे आणि अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला सुनील कुरूप,. गुरुप्रसाद देसाई, महेश खामकर तसेच लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले. यावेळी आमदार सामंत यांनी आपल्या तालुक्यातील मुला-मुलींना ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर खेळताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. ही मॅट केवळ सुविधा नसून खेळाडूंच्या यशाची पहिली पायरी आहे,या सुविधेमुळे भविष्यात लांजा तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तायक्वॉंदो खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg