loader
Breaking News
Breaking News
Foto

भोंदू अशोकबाबा काही वर्षांपूर्वी पैशाने भरलेल्या बॅगा घेवून येत राजापुरात जमीन खरेदीचा केला होता प्रयत्न

रत्नागिरी (वार्ताहर) - शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली सध्या गजाआड असलेल्या नाशिकच्या भोंदू अशोकबाबा खरातने काही वर्षांपूर्वी राजापुरातील जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, असे आता पुढे येत असून मात्र एजंटांकडून नीट माहिती न मिळाल्याने आणि पैशांबाबत उलटसुलट आकडे सांगितल्याने हा व्यवहार काही जमला नाही आणि अशोकबाबा जमिनी खरेदी न करताच परतला अशी चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी राजापुरातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प येणार असल्याने परप्रांतियांसह काही धनदांडग्यांनी या परिसरात जमिन खरेदीचा सपाटा लावला होता. अनेकांनी शेकडो एकर जमीन खरेदीही केली. मात्र पुढे हा प्रकल्प बारगळल्याने या जमिनी तशाच पडून आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशोक खरातने नाणार परिसरात काही हेक्टर जमीन खरेदी करण्याचा विचार केला होता. मोठ्या प्रमाणावर दोन बॅगांमध्ये पैसे घेऊन तो या भागात दाखल झाला होता अशी चर्चा आता होऊ लागली आहे. त्याच्या येण्याची खबर स्थानिक दलालांपर्यंत पोहोचताच अनेक एजंटांनी त्याच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी चित्र वेगळेच दिसून आले. प्रत्येक एजंट वेगवेगळी माहिती देत होता. जमिनींचे दर, मोजमाप, कागदपत्रांची स्थिती याबाबत स्पष्टता नव्हती. एकाच जमिनीबाबत भिन्न-भिन्न आकडे सांगितले जात होते. या गोंधळामुळे खरातचा विश्वास डळमळीत झाला. व्यवहारात पारदर्शकता नसल्याचे लक्षात येताच त्याने ‘या ठिकाणी गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते’ असा निष्कर्ष काढला. अखेरीस कोणताही व्यवहार न करता खरात माघारी फिरला आणि त्यानंतर पुन्हा या भागात गुंतवणुकीसाठी आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या जमिन खरेदी प्रकरणाची आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg