loader
Breaking News
Breaking News
Foto

रविंद्र कालेकर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

दापोली - दापोली एज्युकेशन सोसायटी दापोलीच्या ए . जी .हायस्कूल दापोली चे शाळा समिती अध्यक्ष रवींद्र राजाराम कालेकर यांना लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचा सन 2026 चा कै.ॲड त्र्यंबक दास काका आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 28/3/2026 रोजी जिल्हा ग्रंथालय संघांच्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र शासनाचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांचे ग्रंथालय चळवळीतले कार्य योगदान जिल्हा विभाग राज्य ग्रंथालय संघाच्या चळवळीच्या कार्यात तत्परता व चळवळीसाठी दिलेलं योगदान वाखाणण्यासारखे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली 41 वर्षापासून ग्रंथालय चळवळीचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते आत्तापर्यंत विविध पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळ पदाधिकारी व निवड समितीने यावर्षीचा हा पुरस्कार रवींद्र कालेकर यांना जाहीर केला होता. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 11000/-रुपये सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे आहे. दापोली एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रवींद्र कालेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg