पनवेल - सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी आयोजित मराठा चषक २०२६ (पर्व ४ थे) ही ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी महात्मा शाळेच्या मैदानावर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडली. या स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग नोंदवला होता. अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यांनंतर स्वराज्य MIDC संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. सूर्योदय संघ उपविजेता ठरला, तर साई ११ संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रायोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व सुबक यशस्वी आयोजनामागे सकल मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सदानंद शिर्के व कार्यकारी मंडळ - सदस्य, सल्लागार, सभासद यांची मेहनत आणि नियोजन विशेष उल्लेखनीय ठरले. या स्पर्धेच्या नियोजनाची व व्यवस्थापणाची जबाबदारी संजय मत्रे (बारक्या) तर निवेदक म्हणून योगेश वाघ, दत्ता धोंडे यांनी पार पाडली. एकंदरित, मराठा चषक २०२६ स्पर्धा ही खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळामुळे आणि आयोजकांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे सर्वांच्या स्मरणात राहील अशी भव्य आणि यशस्वी ठरली.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.