loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी येथील 'नॅब नेत्र रुग्णालयात' मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सावंतवाडी: येथील भटवाडी स्थित नॅब नेत्र रुग्णालयाच्या (NAB Eye Hospital) ३ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ​या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान होईल, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना अल्प दरामध्ये चष्मे देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या शिबिरात अत्यंत गरजू आणि दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार असून, नाव नोंदणीसाठी रुग्णांनी आपले आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शिबिराचा तपशील - ​कालावधी ९ एप्रिल ते ३० मे २०२६,सकाळी १०ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. ​स्थळ: नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ​तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी रुग्णांनी ८०१०१३३२०५ (8010133205) या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाइन माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरून देखील दिली जाईल, असे कळवण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg