सावंतवाडी (प्रतिनिधी) - निरवडे येथे 'श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ' आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित "निरवडे महोत्सव २०२६" चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि खवय्यांसाठी 'फूड फेस्टिवल'ची मोठी पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव आणि उपसभापती गौरव मुळीक उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने या महोत्सवाची चर्चा तालुक्यात रंगली आहे. महोत्सवामध्ये चटकदार खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गावाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला संधी देण्यासाठी हा महोत्सव मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या भव्य सोहळ्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, सुनील माळकर (उपाध्यक्ष), अर्जुन पोपकर (सचिव), विशाल पोपकर (खजिनदार) यांच्यासह केतन आजगावकर, महेंद्र गावडे, दादा परब आणि सर्व सदस्यांनी केले. या कार्यक्रमाला माळकरवाडीतील ग्रामस्थ आणि सावंतवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चोख नियोजनाबद्दल आयोजक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.