loader
Breaking News
Breaking News
Foto

जळीतकांड नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दापोली शहर व्यापारी महासंघ पुढे सरसावला

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातील बाजारपेठेत शनिवारी रात्री भीषण आग लागली आणि त्या आगीच्या जळीतकांडात ३ दुकाने जळून खाक झाली. उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीतील त्या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी रविवारी दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने सर्वांना मदतीचे आवाहन केले होते. त्या केलेल्या आवाहनानुसार आज सोमवारी दापोली शहर व्यापारी महासंघाची शहरातील हाॅटेल सन्मान मध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत कशी करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या पहिल्याच बैठकीत उपस्थित व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी सव्वा लाख रुपये जमा करण्याचे महत्त्वाचे काम केले. यावेळी दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे, विश्वस्त दिनेश नायक, सचिव दिनेश जैन, उपाध्यक्ष राकेश कोटीया, कौशिक मेहता, जावेद मणियार, परेश वैशंपायन, ओमकार कर्वे, दिलीप जैन, महेश जैन, दिलखुश जैन, माणिक दाभोळे, अभिषेक देशपांडे, राजेंद्र पेठकर, राजू बुटाला, छोटा व्यापारी संघाचे मंगेश वारसे, राजेंद्र बोथरे, योगेश पिंपळे, मंदार केळकर, सचिन गायकवाड, राम मेहता, साई देसाई, बिपिन मोरे, साई मोरे, निलेश हेदुकर, आशिष स्वामी, धाडवे आदींसह शहरातील अनेक व्यापारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीनंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरे पत्रकारांची संवाद साधताना म्हणाले दापोलीमध्ये शनिवारी जे जळीत कांड घडलं त्यात दुकाने जळून पूर्णपणे खाक झाली. मात्र दापोलीकरांनी दाखवलेल्या सतर्कता, एकजूट आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि पुढील नुकसान रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या पार्श्वभूमीवर दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र राजपुरे यांनी सर्व दापोलीकरांचे आभार मानत या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे. आज झालेल्या बैठकीत सगळ्यांनी चांगले निर्णय घेतले सगळ्यांनी आपले कॉन्ट्रीब्युशन जाहीर केले. पहिल्याच बैठकीत जवळपास एक लाख 25 हजार रुपये गोळा केले. शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांना आवाहन करणार आहे की, प्रत्येकाने ज्याचं दुकान आहे, खोका आहे, पानपट्टी असेल किंवा काहीही असेल व्यापारी असेल त्यांनी आपल्या या बांधवांना मदत करण्यासाठी कमीत कमी पाचशे रुपयांची मदत करावी. ज्यांना जास्तीत जास्त द्यावयाचे आहेत त्यांनी तेही द्यावेत परंतु त्या व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायात उभ करणं हे आपल्या व्यापारी महासंघाचे व्यापाऱ्यांचे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतून आज मीटिंग घेतली. १० तारखेपर्यंत जमा झालेली रक्कम ही एकत्रितपणे नुकसानग्रस्तांना द्यायची आहे असे बैठकीत ठरले.

टाईम्स स्पेशल

बैठकीतूनच नगराध्यक्ष कृपा घाग यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय योगेशदादा कदम यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ घेण्यासाठी नगराध्यक्षांना सांगण्यात आले असल्याची माहिती देत ते पुढे म्हणाले आम्ही व्यापारी बंधू व्यापारी महासंघाच्या मागण्या मंत्रीमहोदय योगेशदादा कदम यांच्या समोर ठेवणार आहोत. त्यामध्ये अग्निशमन बंब असावा यासाठीची पहिली प्राथमिकता असेल या बैठकीत एम एस ई बी अधिकारी, टेलिफोनचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांना बोलवण्याबाबत सांगण्यात आले असून शहरातील गंजलेले पोल तसेच विद्युत पोलवर वाढलेले तारांचे जंजाळ आदी विविध समस्या व विषय हे नाम. योगेशदादा कदम यांना सांगण्यात येणार असून ते विषय व समस्या सोडविण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याची राजपुरे यांनी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg