पनवेल :- आ. विक्रांत पाटील यांची कॉमन वेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेकरिता निवड करण्यात आली असून ही परिषद 9 ते 11 एप्रिल 2026 दरम्यान गोवा येथे पार पडणार आहे. त्यांच्या या निवडीकडे एक उदयोन्मुख, अभ्यासू आणि प्रभावी युवा नेतृत्वाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मोठी संधी म्हणून पाहिले जात आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन, ठोस नेतृत्वगुण आणि जनतेशी असलेली दृढ नाळ यामुळे आमदार विक्रांत पाटील यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रांतील सक्रिय सहभाग, धोरणात्मक समज आणि सार्वजनिक जीवनातील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे त्यांची निवड विशेष ठरते.
या परिषदेत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील निवड झालेले मान्यवर विधिमंडळ सदस्य सहभागी होणार आहेत. हा प्रदेश भारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा मानला जात असून व्यापार, उद्योग, पर्यटन आणि सागरी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतो. या महत्वपूर्ण कॉमनवेल्थ परिषदेत लोकसभेचे अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि धोरणकर्ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेत “विकसित भारत 2047” साध्य करण्यासाठी युवा आमदारांची भूमिका तसेच व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि किनारपट्टी विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
आमदार विक्रांत पाटील यांचा या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत सहभाग हा महाराष्ट्राच्या प्रगत आणि लोकाभिमुख विकास मॉडेलचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारा ठरणार आहे. पायाभूत सुविधा, शहरी विकास, पर्यावरणीय शाश्वतता आणि नागरिक-केंद्रित उपक्रम या क्षेत्रांतील त्यांचे दृष्टिकोन मांडण्याची ही महत्त्वाची संधी आहे. त्यांची ही निवड त्यांच्या नेतृत्वक्षमतेची, सातत्यपूर्ण कार्याची आणि सार्वजनिक जीवनातील प्रभावाची पावती असून, युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आगामी काळात राष्ट्रीय धोरणनिर्मितीत त्यांचा सहभाग अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






























.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)

















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.